जिल्हा कर्मचारी पतपेढीच्या अध्यक्षपदी राजेश कुडाळकर.....उपाध्यक्षपदी वसंतराव पाटोळे बिनविरोध
कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बँक इत्यादी कर्मचारी सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी राजेश वासुदेव कुडाळकर आणि उपाध्यक्षपदी वसंतराव मारुती पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.या पतपेढीची 2025 ते 2030 या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल 2025 मध्ये झाली होती. यामध्ये 14 संचालकांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती.अध्यासी अधिकारी तुषार राणे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश कुडाळकर आणि उपाध्यक्ष वसंतराव पाटोळे यांनी निवडीनंतर आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचा कारभार करताना सर्व संचालकांना विश्वासात घेऊन सभासदांच्या हितासाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या निवडीबद्दल संचालक प्रसाद कुंटे, विनयश्री पेडणेकर, संजय गावडे, दिलीप मसके, मंगेश राऊत, अर्जुन नाईक यांच्यासह सर्व संचालक, सचिव रामचंद्र दळवी आणि कर्मचारी वृंदाने नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
konkansamwad 
