वेंगुर्ला जि. प. पू. प्रा. शाळा क्र. १ मध्ये इतिहासाची साधने व प्रदर्शन कार्यक्रम
वेंगुर्ला
वेंगुर्ला जि प पू प्रा शाळा क्र 1 मध्ये शाळेच्या विठाई सभागृहात "इतिहासाची साधने व प्रदर्शन" हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम. लिना नाईक पुरस्कृत दुर्ग मावळा प्रतिष्ठान, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान रेडी आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमात इतिहासाची साधने यांचे प्रदर्शन करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची अधिक चांगली माहिती मिळाली.
konkansamwad 
