पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘विश्वकर्मा योजनेचा’ फायदा ओबीसी समाजाने घ्यावा : आनंद मेस्त्री.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘विश्वकर्मा योजनेचा’ फायदा ओबीसी समाजाने घ्यावा : आनंद मेस्त्री.

वेंगुर्ला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२३ - २४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात १३००० कोटी रुपये खर्चाची विश्वकर्मा योजना मंजूर केली. याद्वारे पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना मदत मिळणार आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सोनार, लोहार, नांभीक, चांभार, सुतार, होडी बनवणारे, मातीची भांडी आणि इतर वस्तु बनवणारे कुंभार, शिल्पकार, गवंडी, माशांचे जाळे बनविणारे, खेळणी बनविणारे यासारखी पारंपरिक कौशल्य असलेल्या लोकांना अनेक प्रकारे लाभ मिळणार आहेत. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कारागीर आणी कारागीरांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध करणे आणी त्यांनी तयार केलेली स्थानिक उत्पादने, कला आणी हस्तकलेच्या माध्यमातून भारताची परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवणे हे मोदी सरकारचे उद्दीष्ट आहे. याचा ओबीसी समाजाने फायदा घ्यावा, असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चाचे  जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री यांनी केले .
  वेंगुर्लेत भाजपा तालुका कार्यालयात ओबीसी मोर्चाची बैठक प्रदेश कार्यकारिणी सदस्य व ओबीसी समाजाचे शरदजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .यावेळी मान्यवरांचे स्वागत बाबली वायंगणकर , रमेश नार्वेकर व शरद मेस्त्री यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी केले.
    यावेळी ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर, विश्वकर्मा समाज जिल्हाध्यक्ष शरद मेस्त्री, परबवाडा सरपंच शमिका बांदेकर, ग्रामपंचायत सदस्या कार्तिकी किरण पवार, मेस्त्री समाजाचे बाबुराव मेस्त्री - संतोष मेस्त्री - महादेव मेस्त्री - महेश मेस्त्री - सोमा दत्ताराम मेस्त्री, सुवर्णकार समाजाचे रसिका मठकर - प्रमोद वेर्णेकर - सुनिल मठकर, तुळस ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार, वैश्य समाजाचे रविंद्र शिरसाठ व चंद्रशेखर काणेकर, भंडारी समाजाचे विजय बागकर - शशिकांत करंगुटकर - समीर कुडाळकर - प्रशांत नवार - सुहास नवार - राजन पडवळ - गोविंद मांजरेकर - स्वप्नील नवार, नांभीक समाजाचे मारुती कुडाळकर, परीट समाजाचे उमेश आरोलकर - विजय खानोलकर, तेली समाजाचे मयुर वेंगुर्लेकर इत्यादी विविध समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.