वेंगुर्ला येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३२ प्रकरणे निकाली.
वेंगुर्ला.
दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे दिनांक ३ मार्च २०२४ रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वेंगुर्ला तालुक्यांतील दिवाणी कडील ०४ प्रकरणे, फौजदारी कडील १२ प्रकरणे, ग्रामपंचायत पाणीपट्टी, घरपट्टी, विवीध बँका व विध्युत विभाग, वेंगुर्ला यांच्याकडील एकुण १६ वादपुर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली.
यावेळी दिवाणी, फौजदारी व वादपुर्व प्रकरणांतील मिळून एकुण दोन लाख सात हजार तिनशे एवढी रक्कम या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वसूल करण्यांत आली. तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार संघटना, वेंगुर्ला यांचे संयुक्त विदयमाने दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यांत आले होते.
तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला अध्यक्षा, तथा दिवाणी न्यायाधीश, के.के. पाटील, डी.वाय, रायरीकर, सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर), वेंगुर्ला, वकिल एस. जी.ठाकूर, पॅनेल सदस्य, व पक्षकारांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन राष्ट्रीय लोकअदालतीचे कामकाज सुरु करण्यांत आले.
सदरच्या लोकअदालतीमध्ये पॅनेल प्रमुख म्हणून डी.वाय.रायरीकर, सह दिवाणी न्यायाधीश (क.स्तर), वेंगुर्ला, व पॅनेल सदस्य म्हणून ॲड.एस.जी.ठाकूर, यानी काम पाहिले.सदरच्या लोकअदालतीच्या वेळी न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक, एस.एस. कांबळे, एस.एच.खेडेकर, वकील वर्ग, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहभांग घेतला होता.