दोडामार्ग तालुक्यात विकासनिधी कमी पडू देणार नाही - मंत्री नितेश राणे

दोडामार्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या दोडामार्ग तालुक्याकडे आपले पूर्ण लक्ष आहे. या शहराची नगरपंचायत ही आमच्या पक्षाची असल्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांनी दिली. नगरसेवक संतोष नानचे तसेच शहरातील व्यापारी, नागरिक, युवक आदीनी मंत्री राणे यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी ते बोलत होते. कणकवली येथील ओम गणेश या निवासस्थानी मंत्री राणे यांची संतोष नानचे व पदाधिकाऱ्यांनी भेट घेत अभिनंदन केले.