परुळे गावातील रस्ते सुधारणा आणि डांबरीकरणासाठी निधी मंजूर

परुळे गावातील रस्ते सुधारणा आणि डांबरीकरणासाठी निधी मंजूर


वेंगुर्ला 
         प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून वेंगुर्ला तालुक्यातील परुळे येथील गौतमनगर, सुतारवाडी, गाऊडवाडी, दुतोंड रस्त्याच्या सुधारणा व डांबरीकरण साठी  2 कोटी 8 लाख रु. चा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यांची परिस्थिती अतिशय खराब झाली होती. तसेच सदर रस्त्यांबाबत ग्रामस्थांची बऱ्याच वर्षाची मागणी पूर्णत्वास आल्यामुळे गावातून समाधान व्यक्त होत आहे.सदर रस्त्यासाठी शिक्षण मंत्री दिपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच माजी आमदार राजन तेली यांनी पाठपुरवठा केला असून माजी सभापती निलेश सामंत यांच्या प्रयत्नातून देखील अखेर या 3 कि.मी. टप्प्याच्या रस्त्याच्या काम आता सुरू झाले आहे.
             यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, माजी सरपंच तथा सदस्य प्रदिप प्रभू, प्राजक्ता पाटकर, सीमा सावंत, माजी उपसरपंच मनिषा नेवाळकर,  गुड्ड  नेवाळकर, उमेश नेवाळकर, गणपत राऊत, जनार्दन गोडकर वामन नेवाळकर, बाळकृष्ण नेवाळकर, कृष्णा  मेस्त्री यासह ग्रामस्थ उपस्थित होते .सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून अखेर सदर रस्त्याच कामाचा शुभारंभ झाला त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.