वेंगुर्ला कॅम्प येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी.
वेंगुर्ला.
गुरुवारी रमजान ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.वेंगुर्ला कॅम्प मधील मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि शांततेत रमजान ईद अर्थातच ईद उल फित्रचा सण साजरा केला.सकाळी 8:45 वाजता ईदची नमाज कॅम्प परिसरातील जुम्मा मस्जिद मध्ये अदा करण्यात आली. शहरातील सर्व मशिदीत नमाज (प्रार्थना)अदा करण्यासाठी मुस्लीम बांधवांनी गर्दी केली होती.
ईदचा चंद्र बुधवारी रात्री दिसल्यानंतर गुरुवारी सकाळी ठिकठिकाणच्या मशिदीमध्ये ईदनिमित्त नमाज पठण करण्यात आले.जिल्ह्यातील लाखो मुस्लीम बांधवांनी यामध्ये सहभाग घेतला.ईद उल फित्र ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. या वेळी राष्ट्रीय शांतता आणि अखंडता कायम राहावी, अशी प्रार्थना मुस्लीम बांधवांनी केली. त्यानंतर गळाभेट घेऊन लहान-मोठ्यांनी एकमेकांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या.‘ईद उल फित्र’ निमित्त जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मशिदीबाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये ईदनिमित्त आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते.ईद साजरी करण्यासाठी हिंदू धर्मातील नागरिकांनी देखील मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.