बीएसएनएल अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर विजय देसाई यांचे उपोषण मागे.

बीएसएनएल अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर विजय देसाई यांचे उपोषण मागे.

सावंतवाडी.

    तालुक्यातील डेगवे गावात भारत संचार निगम,सावंतवाडी यांनी मोबाईल टाँवरचा मनोरा उभारला होता.सदर मनो-राची बँटरीची कोणी अज्ञातांनी  चोरी केल्याने डेगवेतील ग्रामस्थांना मोबाईल रेंज अभावी गेले वर्षभर नाहक त्रास सहन करावा लागला.
     याबाबतीत गावातील ग्रामपंचायत,ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सदस्य तथा शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री विजय देसाई यांनी संबंधित कार्यालयातील अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटी व लेखी निवेदने दिली होती. त्यामुळे ठराविक उत्तरापलीकडे काही हालचाल नव्हती .म्हणून आज भारताच्या स्वातंत्र्य दिनी १५ आँगस्ट२०२३ रोजी सदर कार्यालयाच्या सावंतवाडी येथील आवारात बेमुदत उपोषणास विजय देसाई हे बसले होते.
   यावेळी भारत संचार निगम सावंतवाडीचे उपमहाप्रबंधक मा आर. व्ही.जेन्ही यांनी व इतर अधिकारी यांनी उपोषण कर्त्याची  भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.व होणाऱ्या विलंबाचे कारण सांगितले.व सदर बाबतीत व्यक्तीगत लक्ष देऊन येत्या  १५ सप्टेंबर २०२३ पुर्वी सदर प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे लेखी पत्र दिले आहे.त्यामुळे सदर उपोषण मागे घेतले असून;जर सदर कालावधीत कोणत्याही प्रकारची हालचाल झाली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर परत त्याच ठिकाणी परत उपोषणास बसणार असल्याचे जाहीर केले आहे.
   यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी, उपतालुका प्रमुख तथा माजी सरपंच मंगलदास देसाई, सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमान सुनील देसाई, गजानन नाटेकर व अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.