मालवण येथे उद्या बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन नोंदणी, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन.
मालवण.
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दि. ६ ऑक्टोबरला सकाळी १० ते ५ यावेळेत बांधकाम कामगारांसाठी मालवणचे माजी नगरसेवक यतीन खोत यांच्या निवासस्थानी ऑनलाइन नोंदणी व आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी बांधकाम कामगारांचे ऑनलाइन अर्ज भरून नवीन नोंदणी केली जाणार आहे. कामगारांना शासन स्तरावर कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ही ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच यावेळी आधारकार्ड नोंदणी तसेच आधारकार्ड दुरुस्ती अथवा अपडेट शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे.
बांधकाम कामगार नोंदणी करिता खालील नमूद कागदपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. फोटो, आधारकार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, नगरपालिका दाखला, कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड, आधारकार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मतदान कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला, सर्व्हिस ओळखपत्र शासकीय, ड्रायव्हिंग लायसन्स, पासबुक, शाळा ओळखपत्र यापैकी कोणताही एक पुरावा आवश्यक आहे. तरी बांधकाम कामगार नोंदणी व आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी यतीन खोत - ९४२२५८४६४१, शिल्पा खोत - ९३२६४७७७०७ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, युवतीसेना कुडाळ मालवण प्रमुख समन्वयक शिल्पा खोत, भाई कासवकर यांनी केले आहे.