पाटकर हायस्कूल येथे क्रांती दिन साजरा.

वेंगुर्ला.
येथील रा.कृ.पाटकर हायस्कूल येथे दि.९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा यावा, तसेच आपल्या उज्ज्वल आणि स्वातंत्र्य इतिहासाचे ज्ञान व्हावे या हेतूने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्याचा आले होते.तसेच विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी प्रार्थना व देशभक्तीपर गीत सादर केले.
या प्रसंगी श्रीम. मांजरेकर मॅडम, सौ.खरात मॅडम यांनी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक क्रांती दिनाची महिती दिली.
यावेळी श्री. बागुल सर आणि श्रीम. जाधव मॅडम यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सौ पीळणकर मॅडम, श्री पेडणेकर सर यांच्या सहकार्याने आणि इतिहास विषय शिक्षिका सौ. खरात मॅडम यांच्या संकल्पनेतून उत्कृष्टरित्या कार्यक्रम संपन्न झाला.