सलग तिसऱ्या वर्षी मध्यप्रदेशमध्ये निनादनार कणकवलीतील सिंधुगर्जना पथकाचा आवाज

सलग तिसऱ्या वर्षी मध्यप्रदेशमध्ये निनादनार कणकवलीतील सिंधुगर्जना पथकाचा आवाज

कणकवली

 

    एन. बी. एस चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोल ताशा पथक कणकवली रामनवमी निमित्त मध्यप्रदेश राज्यातील टिकमगढ येथे येत्या २७ मार्च रोजी २५०वे वादन करण्यासाठी आज सायंकाळी कणकवली रेल्वे स्थानकातून रवाना होणार आहे. यापुर्वी सिंधुगर्जना पथकाने ओडिशा, दिल्ली, मध्यप्रदेश, गोवा व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या वादनाने ठसा उमटविला आहे. पी.एम. विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात तसेच पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त द्वारका, दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयाच्या निमंत्रणावरून वादन करण्याचा मान मिळाला, यापूर्वी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा, २६ जानेवारी दिल्ली प्रजासत्ताक दिन परेड यांसारख्या कार्यक्रमांमध्ये विशेष आमंत्रित म्हणून सहभागी झाले आहे. सिंधुगर्जना पथकाने २०२४ मध्ये १००० वाद्यांसह अखंड वादन करून आपल्या नावावर विश्वविक्रमाची नोंद देखील केली आहे.सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करणाऱ्या पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सिंधुदुर्गातील ६० स्त्री पुरुष कलाकारांच्या संचात सिंधुगर्जना पथक मध्यप्रदेश मध्ये जाऊन वादन करणार आहे.