कोचरे 'भावई तलाव' सुशोभीकरण विकासकामाचे भूमिपूजन

कोचरे 'भावई तलाव' सुशोभीकरण विकासकामाचे भूमिपूजन

 

वेंगुर्ले,

 

        वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे येथील श्री भावई तलाव परिसर सुशोभीकरण करणे या राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या सन २०२४-२५ प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत सुमारे ४० लाख रुपये किमतीच्या विकासकामाचे भूमिपूजन  शिवसेना, भाजप महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन पर्यटन मंत्री गिरीष महाजन, आताचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून व पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून हे सुमारे ४० लाख किमतीचे विकासकाम मंजूर झाले होते. या भूमिपूजन प्रसंगी शिवसेनेचे सचिन वालावलकर, भाजप तालुकाध्यक्ष पपू परब, जि. प. सदस्य यज्ञा साळगावकर, पं. स. सदस्य सचिन देसाई, विष्णू फणसेकर, शिवसेनेचे अजित राऊळ, उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, ग्रा. प. सदस्य संजय गोसावी, विशाल वेंगुर्लेकर, अनिल सुतार, प्रगती राऊळ, स्वरा हळदणकर, शिवसेना विभागप्रमुख दत्ता साळगावकर, बाळू राणे, उपेंद्र रावले, माजी निवृत्त पोलीस अधिकारी कोचरेकर, आबा कोचरेकर, शाखा प्रमुख श्रीरामवाडी भाई खवणेकर, परबवाडा ग्रा प सदस्य संतोष सावंत तसेच कोचरा ग्रामस्थ उपस्थित होते.