वेंगुर्ला तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी; विजेत्यांना रोख पारितोषिके

वेंगुर्ला तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी; विजेत्यांना रोख पारितोषिके

 


वेंगुर्ले


      स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, सांघिकता आणि सांस्कृतिक मूल्ये रुजविण्यासाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व विशाल परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुकास्तरीय शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2.30 वाजता वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला येथे होणार आहे. वेंगुर्ला तालुक्यातील सर्व प्रशालांमधील प्राथमिक गट इयत्ता 5 वी ते 7 वी आणि माध्यमिक गट इयत्ता 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
 
माध्यमिक गट : प्रथम ₹3,500, द्वितीय ₹3,000, तृतीय ₹2,500, चतुर्थ ₹1,000, पाचवा ₹1,000  
प्राथमिक गट : प्रथम ₹2,500, द्वितीय ₹2,000, तृतीय ₹1,500, चतुर्थ ₹1,000, पाचवा ₹1,000  

     सर्व विजेत्या संघांना रोख रक्कमेसह चषक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.प्रत्येक गटात प्रथम नावनोंदणी करणाऱ्या 10 संघांनाच प्रवेश मिळेल. एका संघात किमान 6 व कमाल 15 विद्यार्थी असावेत. राष्ट्रभक्तीपर, प्रेरणादायी व संस्कारक्षम समूहगीत मराठी, हिंदी किंवा संस्कृत भाषेत सादर करावे लागेल. चित्रपट गीतांना परवानगी नाही. सादरीकरणासाठी जास्तीत जास्त 7 मिनिटे वेळ मिळेल.संगीत साथीसाठी हार्मोनियम, तबला, ढोलकी, टाळ यांसारखी मर्यादित वाद्ये वापरणे बंधनकारक आहे. रेकॉर्डेड ट्रॅक किंवा ऑर्केस्ट्राला परवानगी नसेल. साथ करणारे वादक संबंधित शाळेचे किंवा इयत्ता 10 वी पर्यंतच्या इतर शाळेतील विद्यार्थी असावेत.सूर, ताल, शब्दांची स्पष्टता, अभिव्यक्ती, समन्वय आणि शिस्त या निकषांवर मूल्यमापन होणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.स्पर्धेसाठी नावनोंदणीची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2026 आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सचिन परुळकर 9421238053 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.