अवकाळी पावसामुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे - इर्शाद शेख
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या भातशेतीचे नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे अशी विनंती सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच अडचणीत असलेला जिल्ह्यातील शेतकरी या आस्मानी संकटाने मेटाकुटीस आला आहे. तरी आचारसंहितेचा कोणताही बाऊ न करता या झालेल्या नुकसानीचे तातडीने व योग्य पध्दतीने पंचनामे करावेत व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत असे निवेदनात सांगण्यात आले आहे.
यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, ओरोस शहर अध्यक्ष महेश परब, तबरेज शेख आदी उपस्थित होते.