वेंगुर्लेत ३ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर - ग्रामीण आघाडीची बैठक
वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दिनांक ३ एप्रिल रोजी सायंकाळी ३ वाजता महिला काथ्या कारखाना कॅम्प वेंगुर्ले येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर -ग्रामीण आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली असून यावेळी महिला सक्षमीकरण तसेच महिलांना शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यात येणार आहे. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहराध्यक्ष सुरज परब व युवतीअध्यक्ष निधी शिरोडकर यांनी केले आहे.
konkansamwad 
