देवगड सौंदाळे सडा परिसरात आग!...आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान

देवगड सौंदाळे सडा परिसरात आग!...आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान


 

देवगड

 

  देवगड तालुक्यातील सौंदाळे सडा परिसरात आंबा बागेला आग लागून गावातील २५ पेक्षा जास्त बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.ही आग सुमारे चार ते पाच किलोमीटरच्या विस्तीर्ण भागात पसरली असून यात २०० ते २५० हापूस आंब्याची कलमे पूर्णपणे होरपळून निघाली आहेत. ही आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी रात्रभर शर्थीचे प्रयत्न केले, तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा आग पसरल्याने बागायतदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. यंदा आधीच आंब्याचे उत्पादन कमी असताना या संकटामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. सरपंच मनाली कामतेकर आणि उपसरपंच विष्णू राणे यांनी प्रशासनाकडे या घटनेचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.