लँडिंगदरम्यान एअर कॅनडा एक्सप्रेस विमानाची ग्राउंड फायर व्हेइकलला धडक

लँडिंगदरम्यान एअर कॅनडा एक्सप्रेस विमानाची ग्राउंड फायर व्हेइकलला धडक

न्यूयॉर्क

 

   एअर कॅनडा एक्सप्रेसचे विमान लँडिंग करत असताना ग्राउंड फायर व्हेइकलला धडकल्याने मोठी दुर्घटना घडली. ही घटना 22 मार्च 2026 रोजी रात्री लागार्डिया विमानतळावर घडली.या विमानात 70 पेक्षा जास्त प्रवासी आणि कर्मचारी होते. Bombardier CRJ-900 या विमानाने रनवेवर उभ्या असलेल्या आपत्कालीन वाहनाला धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, विमानाचा वेग सुमारे 29 mph होता. या धडकेत सुमारे 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे, मात्र कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. घटनेनंतर FAA (फेडरल एव्हिएशन ऍडमिस्ट्रेशन) ने तात्काळ ग्राउंड स्टॉप जारी केला. यामुळे विमानतळावरील सर्व आगमन आणि निर्गमन थांबवण्यात आले.या घटनेमुळे अनेक उड्डाणे रद्द, वळवण्यात आली. किमान 18 उड्डाणे इतर विमानतळांकडे वळवण्यात आली किंवा परत पाठवण्यात आली.FAA आणि NTSB यांनी या घटनेची औपचारिक चौकशी सुरू केली आहे. रनवेची तपासणी आणि सुरक्षा पाहणीनंतर ऑपरेशन्स हळूहळू सुरू होण्याची अपेक्षा आहे.लागार्डिया विमानतळ हा अमेरिकेतील अत्यंत व्यस्त विमानतळांपैकी एक असून येथे दरवर्षी 30 दशलक्षाहून अधिक प्रवासी प्रवास करतात.