पोखरणमधील शाळेत कृषीदूतांच्या माध्यमातून चित्रकला व निबंध स्पर्धा

कुडाळ
पोखरण गावातील डॉ. एस.एस. कुडाळकर हायस्कूल मध्ये शाळकरी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. शाळकरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत प्रतिभेला वाव देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आणि निपुणतेने सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले. दोन्ही स्पर्धा दोन तासांमध्ये पार पडल्या, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर चित्रकला व निबंध सादर करून आपली कलागुणे, लेखनकला व विचार मांडणी प्रदर्शित केली.
कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय, ओरोस चे प्राध्यापक श्री. भेंडे सर, ग्रामीण कार्यानुभव अध्यक्ष प्रा. प्रसाद ओगले सर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत साहिल कापसे, राजेश परब, शिवाजी कारंडे, प्रकाश कराडे, प्रशांत अमृतट्टी यांनी केले.
समारोपाच्या वेळी, प्रमुख अतिथींनी कृषीदूतांना पुढील काळात अशाच स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी प्रोत्साहन व आवाहन केले.