कुडाळ तालुक्यातील घावनाळे येथे 'आमदार चषक २०२६'

कुडाळ तालुक्यातील घावनाळे येथे 'आमदार चषक २०२६'

 


कुडाळ 


    आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुक्यातील घावनाळे येथे दिनेश वारंग मित्र मंडळ व शिवसेना घावनाळे यांच्यावतीने "आमदार चषक 2026" क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त 11 मार्च ते 17 मार्च या कालावधीत वाढदिवस सप्ताह साजरा करण्यात येणार असून विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या सप्ताहांतर्गत 11 मार्च ते 15 मार्च दरम्यान "आमदार चषक 2026" क्रिकेट स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 1 लाख 26 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 50 हजार 26 रुपये, तृतीय पारितोषिक 11 हजार 26 रुपये, तर चतुर्थ पारितोषिक 11 हजार 26 रुपये असे ठेवण्यात आले आहे.ही स्पर्धा घावनाळे येथील खुटवडवाडी आयन मळा मैदानावर होणार असून एक ग्रामपंचायत - एक संघ तसेच एक नगरपंचायत एक संघ या मर्यादित स्वरूपातील ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा असणार आहेत.तसेच 16 मार्च रोजी घावनाळे गावातील सर्व शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे. 17 मार्च रोजी सकाळी 9 वाजता घावनाळे ग्रामपंचायत येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या वाढदिवस सप्ताहानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांनी व क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन दिनेश वारंग मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.