आजगावच्या वेतोबा मंदिरात पालकमंत्री नितेश राणेंचा शब्द.....'मायनिंग होऊ देणार नाही, नारळ ठेवून गाऱ्हाणे'

आजगावच्या वेतोबा मंदिरात पालकमंत्री नितेश राणेंचा शब्द.....'मायनिंग होऊ देणार नाही, नारळ ठेवून गाऱ्हाणे'

 


आजगाव


       आजगाव परिसरात प्रस्तावित मॅग्नेटिक ड्रोन सर्व्हेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र जनआक्रोश उसळला असताना, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आजगावच्या वेतोबा मंदिरात भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी "या भागात मायनिंग होऊ देणार नाही" असा शब्द देत वेतोबा मंदिरात नारळ ठेवून गाऱ्हाणे घालण्यात आले. 
       आजगाव येथे होऊ घातलेल्या मायनिंग प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर ड्रोन सर्वेक्षणानंतर गावात वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर २३ तारखेला या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी आज येथील वेतोबा मंदिरात ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी मी पालकमंत्री असेपर्यंत आजगावच काय परिसरातील ११ ही गावात मायनिंग प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका श्री. राणे यांनी मांडली, 
         यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आरोग्य सभापती रितेश राऊळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, ग्रामस्थ तथा अॅड. स्वप्निल प्रभू आजगावकर, सरपंच यशस्वी सौदागर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, अजित नातू आदी उपस्थित होते.
       मॅग्नेटिक ड्रोन सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या तीव्र विरोधानंतर हा घटनाक्रम घडल्याने परिसरात त्याची मोठी चर्चा सुरू आहे. ग्रामस्थांनी आपल्या जमिनी, पर्यावरण  संरक्षण करण्यासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.