कणकवली येथील डामरे वरचीवाडी येथे घराला आग
कणकवली
तालुक्यातील डामरे (वरवचिवाडी) येथे श्री. भिकाजी नारायण सावंत यांच्या घराला रविवारी (ता. ३) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे १ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.मिळालेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. आगीत घरातील फ्रीज, कपाट, टीव्ही, सर्व कपडे, लाईट फिटिंग, धान्य तसेच घरातील भांडी पूर्णतः जळून खाक झाली.या दुर्घटनेमुळे सावंत कुटुंबियांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक पाहणी केली आहे.
konkansamwad 
