जिल्हास्तरीय समई नृत्य स्पर्धेत 'श्री समर्थ समई नृत्य पथक' चा डंका....पटकावला प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय समई नृत्य स्पर्धेत 'श्री समर्थ समई नृत्य पथक' चा डंका....पटकावला प्रथम क्रमांक!

देवगड 


    डिगस येथे श्री काळंबा देवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य जिल्हास्तरीय समई नृत्य स्पर्धेत देवगड तालुक्यातील 'श्री समर्थ समई नृत्य पथक, खुडी जुवीवाडी' या संघाने आपल्या अष्टपैलू सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावून विजयाची मोहोर उमटवली कारिवणेटेंब वाडी मित्र मंडळ, डिगस यांच्या वतीने या स्पर्धेचे नेटके आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध नामवंत पथकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत खुडी जुवीवाडीच्या पथकाने समई नृत्यातील लयबद्धता, शिस्त आणि पारंपरिक कलेचे उत्कृष्ट दर्शन घडवत उपस्थितांची मने जिंकली स्पर्धेच्या सांगता समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या पथकाला गौरवण्यात आले. खुडी जुवीवाडीच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत असून, या विजयाने पथकाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कार्यक्रमाला भाविक आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली होती