योग विद्या ही भारत देशाला लाभलेली महान प्राचीन परंपरा - महेश इंगळे....स्विमिंग ग्रुपच्यावतीने जागतिक योग दिन साजरा 

योग विद्या ही भारत देशाला लाभलेली महान प्राचीन परंपरा - महेश इंगळे....स्विमिंग ग्रुपच्यावतीने जागतिक योग दिन साजरा 

अक्कलकोट 


      जगाला मनशांती आणि व्याधीमुक्त जीवन प्रदान करणारी योग विद्या ही भारत देशाला लाभलेली महान प्राचीन परंपरा असल्याचे प्रतिपादन येथील स्विमींग ग्रुपचे संस्थापक व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी केले.आज जागतिक योग दिनाचे औचित्य साधून येथील स्विमिंग ग्रुपच्या वतीने  योग प्रशिक्षक व ग्रुपचे सदस्य विद्याधर गुरव सर, सनदी लेखापाल ओंकारेश्वर उटगे, डॉ.चिंचोळी, आप्पा गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबीराच्या माध्यमातून सामुहीक योगासनं व प्राणायाम, सुर्य नमस्कार, ध्यान, मुद्रा, झुम्बा डान्स इत्यादी प्रकार करून मोठ्या उत्साहात जागतिक योग दीन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थापक महेश इंगळे बोलत होते.प्रारंभी स्विमींग ग्रुपच्या वतीने महेश मालक इंगळे, प्रथमेश मालक इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पुजन करून योग शिबीर घेण्यात आले. पुढे बोलताना संस्थापक महेश मालक इंगळे यांनी तणावमुक्त जीवन आणि मनशांती अनुभवण्यासाठी नेहमीच योगाभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. 
        सुदृढ व निरोगी आरोग्याकरिता सर्वांनी नियमित व्यायाम, प्राणायाम व योगाभ्यासावर भर द्यावा. तुम्हाला जर तुमची जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर आपल्या आयुष्यात व्यायाम, पोहणे, व योगाचा समावेश करून घ्या. नियमीत व्यायाम व योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहतं. मात्र योगा करत असताना याच्या नियमांचं पालन करणंही आवश्यक आहे. योगा आपलं शरीर तंदुरूस्त राखण्यास मदत करतो. यामुळे आज सर्व नागरिकांनी या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभुमीवर नियमीत व्यायाम व योगाभ्यासाचा संकल्प करून तो सिध्दीस न्यावा असे मनोगत व्यक्त करून सर्वांना आजच्या या जागतिक योग दीनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी योग प्रशिक्षक व ग्रुपचे सदस्य विद्याधर गुरव, ओंकार उटगे, प्रा.डॉ. शिवराया आडवितोट, संतोष पराणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित सदस्यांना अमर पाटील यांच्याकडून एनर्जी ड्रींक, संतोष मालक पराणे यांच्या कडून केळी व खजूर तर संदीप पंडीत यांच्या वतीने गुळ शेंगदाण्याची चिक्की हे खाद्य पदार्थ पुरविण्यात आले.
       या योग शिबीरात स्विमींग ग्रुप मधील प्रथमेश मालक इंगळे, संतोष पराणे,  समर्थ पराणे, श्रीनाथ पराणे, सचिन किरनळ्ळी, मा.प्राचार्य डॉ.शिवराया आडवितोट सर, नगरसेवक अविनाश मडीखांबे, नगरसेवक शैलेश राठोड, समर्थ पराणे, विश्वनाथ देवरमनी सर, कुमार हत्तुरे, रमेश कणबसे, शेखर आडवीतोटे, रामलिंगय्या स्वामी,रफिक पठाण, मोईन पठाण, प्रितेश किलजे, अंकुश केत, सुनील पवार, मधुकर सदाफुले, शिवशरण पाटील, श्रीकांत झिपरे, राजू एकबोटे, सैदप्पा इंगळे, श्रीशैल गवंडी, अमर पाटील, डॉ.राजू मलंग, मेजर अमोल माने, दत्तात्रय कटारे, डॉ.पांडुरंग पाटील, संदीप पंडित, शांतय्या स्वामी, तन्मय इचगे, सिद्धाराम बिडवे, मनोज जगताप सर, संतोष जवळगी, संदीप बिराजदार, गणेश कांदे, राहुल स्वामी, श्रीनिवास गुंजे, सागर माळी, पिंटू स्वामी, सिद्धाराम अष्टगे, संतोष मुळे, विपुल गवळी, निखिल गवळी, अथर्व वाकडे, शिवराज जमगे, रेवणू स्वामी, महांतेश कुंभार, डॉ.श्रीकांत पाटील, तारापुरे साहेब, समर्थ भोसले, समर्थ स्वामी, प्रसाद इंगळे, आदित्य किलजे, वर्धन चिंचोळी, गिरीश पाटील, अजिंक्य पाटील, अनिकेत कांबळे, कुमारी आयुष्मती उटगे, श्रीपाद उटगे, अथर्व कोम्पा, गिरीश पाटील, अजिंक्य पाटील, कुमारी कीर्ती एकबोटे, कुमारी जानवी एकबोटे, रमेश शिंदे सर आदींसह शहरातील डॉक्टर, उद्योजक, व्यापारी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व  महेश इंगळे मित्रपरिवारचे सदस्य मोठया संख्येने सहभागी झाले होते.