कासार्डे येथे मालवाहू कंटेनर शाळेच्या कंपाऊंडला धडकला

कासार्डे येथे मालवाहू कंटेनर शाळेच्या कंपाऊंडला धडकला

कणकवली

 

   मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे-जांभूळवाडी जिल्हा परिषद शाळेसमोर मालवाहू कंटेनरचा भीषण अपघात झाला, चालकाचा ताबा सुटल्याने हा कंटेनर थेट शाळेच्या संरक्षक भिंतीला धडकला.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सदर कंटेनर कासार्डे जांभूळवाडी शाळेसमोरून जात असताना चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर रस्त्याशेजारी असलेल्या शाळेच्या कंपाऊंडवर जाऊन आदळला. मध्यरात्रीच्या वेळी झालेल्या या अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. शाळेला सुट्टी असल्याने आणि रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला.