जागतिक महिला दिन विशेष

जागतिक महिला दिन विशेष

 

 

           जवळपास एका शतकाहून जास्त काळ 8 मार्च हा दिवस महिलांसाठी खास समजला जातो. पण का?  क्लारा झेटकीन या महिलेने 1910 साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. या दिवसाचा उगम कामगार चळवळीतून झाला.याच बीज रोवल गेल ते 1908 साली जेव्हा 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला. कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार अशा त्यांच्या मागण्या होत्या.यानंतर एका वर्षाने सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली.हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना पुढे आणली ती क्लारा झेटकीन या महिलेने. त्या साम्यवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या होत्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या. त्यांनी ही कल्पना सर्वप्रथम काम/नोकरी करणाऱ्या महिलांच्या परिषदेत कोपेनहेगनमध्ये 1910 साली मांडली होती.त्या परिषदेला 17 देशांमधून 100 महिला उपस्थित होत्या. सगळ्यांनी क्लारा यांची कल्पना एकमुखाने मान्य केली.त्यानुसार पहिला जागतिक महिला दिवस 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये साजरा केला गेला होता. त्याची शताब्दी 2011 साली साजरी झाली.महिला दिवसाला संयुक्त राष्ट्रांची अधिकृत मान्यता 1975 साली मिळाली, तर प्रत्येक वर्षांची खास थीम स्वीकारायला सुरुवात झाली 1996 साली. पहिलं घोषवाक्य होत - 'भूतकाळ साजरा करताना भविष्याची धोरण ठरवण.' सध्या जागतिक महिला दिन हा महिलांच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचे मैलाचे दगड साजरे करण्याच्या उद्देशाने सर्वत्र साजरा केला जातो.तसच या दिवशी अजूनही समाजात अस्तित्वात असलेल्या असमानतेविरोधात निदर्शनही केली जातात.क्लारा झेटकिन यांनी जेव्हा महिला दिवसाची कल्पना मांडली तेव्हा त्यांच्या मनात कोणतीही ठराविक तारीख नव्हती. ती तारीख ठरली 1917 साली.तेव्हा पहिल महायुद्ध सुरू होत आणि त्या दरम्यानच रशियन महिलांनी 'भाकरी आणि शांतता' अशी मागणी घेऊन संप पुकारला. चार दिवसांनी राजकीय उलथापालथ झाली, रशियन झारना पद सोडाव लागल आणि त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारन महिलांना मतदानाचा अधिकार दिला.रशियात तेव्हा ज्युलियन कॅलेंडर वापरले जात होत. ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे ज्या दिवशी महिलांनी संप पुकारला त्या दिवशी तारीख होती 23 फेब्रुवारी ग्रेगोरियन कॅलेंडर (जे आज आपण सगळीकडे वापरतो) त्यानुसार ही तारीख होती 8 मार्च. त्यामुळेच त्या ऐतिहासिक संपाची आठवण म्हणून 8 मार्चला जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. महिला दिन सुरू झाला, त्यासुमारास अनेक देशांत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. युकेमध्ये 1918 साली तर अमेरिकेत 1920 साली त्यासंदर्भातला कायदा पास झाला.ब्रिटनमध्ये महिलांना हा अधिकार मिळवून देण्यात वूमेन्स सोशल अँड पॉलिटिकल युनियन या पक्षान महत्त्वाच योगदान दिल. या संघटनेच्या ध्वजामध्ये जांभळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगांचा वापर करण्यात आला होता आणि हेच रंग महिला दिनाच प्रतीक बनले.जागतिक महिला दिनाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार "जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठेच प्रतीक आहे, हिरवा रंग आशेच प्रतीक आहे तर पांढरा रंग शुद्धतेच प्रतीक आहे. अर्थात शुद्धता ही संकल्पनाच तशी वादग्रस्त आहे." महिला हक्कांच्या आणि समानतेच्या लढ्याशी जांभळ्या रंगाचे नात असल्यानेच हा रंग महिला दिनाच एक प्रतीक बनला आहे. गेल्या वर्षी युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जेव्हा युक्रेनमधून महिला आणि मुल जागतिक महिला दिनाच्या दिवशी युरोपातल्या हंगेरी या राष्ट्रात पोहचली तेव्हा त्याच स्वागत फुले देऊन करण्यात आल.जागतिक महिला दिन हा रशियासकट अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असतो. रशियात या काळात फुलांची विक्री चौपट होते. चीनमध्ये 8 मार्चला अनेक महिलांना कामाच्या ठिकाणी हाफ डे दिला जातो.इटलीमध्ये जागतिक महिला दिनाला फेस्टा डेला डोना असही म्हणतात. या दिवशी महिलांना मीमोसाची फुल दिली जातात. याची सुरुवात कशी झाली हे सांगता येणार नाही पण अस म्हणतात की दुसऱ्या महायुद्धानंतर रोममध्ये याची सुरुवात झाली. अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना वूमन्स हिस्ट्री मन्थ(महिलांच्या इतिहासाचा दिवस) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्राध्यक्षांकडून अमेरिकन महिलांच्या यशाच कौतुक करणार मानपत्र काढल जात.2023 सालच्या महिला दिनासाठी संयुक्त राष्ट्रांची थीम -'डीजी जॉल: संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी' अशी आहे.या थीमचा उद्देश आहे की जगभरात ज्या महिला आणि मुली तंत्रज्ञान आणि ऑनलाईन शिक्षणात जे योगदान देत आहेत ते ओळखून त्याचा यथोचित सन्मान करावा.यंदा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डिजिटल लिंग असमानतेमुळे महिला आणि मुलींच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हेही शोधण्याचा प्रयत्न असेल.संयुक्त राष्ट्रांच्या एका अंदाजानुसार इंटरनेटचा अॅक्सेस नसल्याने कमी आणि मध्यम उत्पन्न गटातल्या देशांच्या जीडीपीला 2025 पर्यंत 1.5 ट्रिलीयन डॉलर्सचा फटका बसू शकतो.पण यंदा इतरही थीम आहेत. जागतिक महिला दिनाच्या वेबसाईटवर त्यांचा उल्लेख तुम्हाला आढळून येईल. यात असे म्हटले की महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं' तसंच 'महिलांबद्दल असलेल्या जुन्या विचारधारांना तोडणं, त्यांना कमी लेखल जात याकडे लक्ष वेधण, आणि त्यांचा सर्वांगिण विकास होईल हे पाहाण अशाही काही थीम यंदा साजऱ्या केल्या जातील.