आंबोली ते हिरण्यकेशी रस्त्याची दोन महिन्यातच दुरवस्था.....कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका......मनसेची मागणी
कुडाळ
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जून २०२६ मध्ये पूर्ण झालेल्या आंबोली ते हिरण्यकेशी रस्त्याची अवघ्या दोन महिन्यातच दुरवस्था झाल्याने संताप व्यक्त करत या कामाची चौकशी करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी मनसेने केली आहे.याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, कुडाळ यांना निवेदन दिले. मे. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन सावंतवाडी या कंत्राटदाराने केलेले हे काम दर्जाहीन असून लाखो रुपये पाण्यात गेले असून रस्ता वाहतुकीस धोकादायक बनल्याचे निवेदनात म्हटले आहे.रस्त्याचे स्वतंत्र ऑडिट करावे, पडलेले खड्डे त्याच कंत्राटदाराकडून बुजवून घ्यावे आणि टाळाटाळ केल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, आंबोली विभाग अध्यक्ष काशीराम गावडे, आंबोली शाखा अध्यक्ष रामचंद्र अमृसकर उपस्थित होते.
konkansamwad 
