मालवण मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराचा २४ व २५ एप्रिलला वर्धापन दिन सोहळा

मालवण मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराचा २४ व २५ एप्रिलला वर्धापन दिन सोहळा

 

मालवण 

 

         मालवण शहरातील मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराचा ११ वा वर्धापन दिन सोहळा २४ व २५ एप्रिलला साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.यानिमित्त २४ एप्रिलला सकाळी ८ ते दुपारी १ वाजता धार्मिक विधी श्री देवी पंचायतन याग होमहवन, सायंकाळी ६ वाजता पारंपारिक आरती, सायंकाळी ६.३० वाजता ब्राम्हणदेव महिला मंडळ, नाद भोळेवाडी, ता. देवगड यांचे समई नृत्य, २५ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६.३० वाजता महिला हळदी कुंकू समारंभ, सायंकाळी ५ वाजता श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ कांदळगाव देऊळवाडी, मालवण यांचे भजन (बुवा- राजेंद्र कोदे, मृदुंगमणी- बंटी कांदळगावकर, तबला साथ- दत्ताराम डिकवलकर), सायंकाळी ६.३० वाजता पारंपरिक आरती, सायंकाळी ७ वाजता श्री देवी पावणाई दिंडी भजन हुमरोसवाडी माळगाव यांचे दिंडी भजन होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आई काळबादेवी मंदिर विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे