विश्राम ठाकर आदिवासी कला आंगणचा २०वा वर्धापन दिन ३ मे रोजी....'कला आंगण महोत्सव २०२६' मध्ये विविध कार्यक्रम
कुडाळ
विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट, सिंधुदुर्ग या संस्थेचा 20 वा वर्धापन दिन रविवार, 3 मे 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त 'कला आंगण महोत्सव 2026' चे आयोजन करण्यात आले आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्यात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत ठाकर समाजाचा वधू-वर सूचक पालक मेळावा होणार आहे.सायंकाळी 7.30 वाजता मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. त्यानंतर 7.45 वाजता कै. शरद गरुड स्मृती कला पुरस्कार 2026 व कोकणरत्न सन्मान 2026 चे वितरण तसेच अन्य मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडेल.रात्री 8.30 वाजता ठाकर लोककलेचे सादरीकरण होणार असून, रात्री 9.00 वाजता ओंकार दशावतार नाट्य मंडळ (वेंगुर्ला) यांचा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग 'सुवर्णमणी प्राप्ती' सादर होणार आहे.ठाकर आदिवासी समाजाची कला, संस्कृती आणि लोकपरंपरा जतन व संवर्धनासाठी गेली 20 वर्षे विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण कार्यरत आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांना कला रसिकांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्री. चेतन गंगावणे - 9987653909 यांच्याशी संपर्क साधावा.
konkansamwad 
