डॉ. प्रमोद वालावलकर यांचे निधन

कुडाळ
मूळ वालावल गावचे रहिवासी आणि सध्या कुडाळ-कुंभारवाडीत वास्तव्यास असलेले आणि महिला बाल रुग्णालयात वैद्यकीय अधिष्ठाता या पदावर कार्यरत असणारे डॉ. प्रमोद प्रभाकर वालावलकर (वय ५८) यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी अधिपरिचारिका प्रज्ञा वालावलकर, मुलगा ध्रुव, भाऊ नरेंद्र, बहीण असा परिवार आहे. डॉक्टरना पृथ्वीवरील देव समजले जाते. रुग्णांच्या दृष्टिकोनातून देवपदाला पोहोचलेल असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. प्रमोद वालावलकर. कुडाळवासियांचे लोकप्रिय डॉक्टर अशी ओळख डॉ. प्रमोद वालावलकर यांची आहे. डॉ. वालावलकर हे राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारात वाढले. कुडाळसह संपूर्ण तालुका व परिसरातील रुग्णांसाठी वालावलकर यांनी चांगली सेवा दिली.