वेंगुर्लेत गुढीपाडवा निमित्त वेषभूषा व अभिनय स्पर्धा उत्साहात...
वेंगुर्ला
हिंदू धर्माभिमानी मंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने गुढीपाडवा व हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आयोजित वेषभूषा व अभिनय सादरीकरण स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी रामायण, महाभारत तसेच इतिहास आणि संत परंपरेतील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.इयत्ता ६ वी ते १० वी गटातील स्पर्धेत वरदा समृद्धी संदीप परब (वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला) हिने प्रथम क्रमांक पटकावला. श्राव्या अनुश्री अनुप कांबळी (रा. कृ. पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला) हिने द्वितीय क्रमांक मिळवला, तर काशिनाथ संजना संतोष तेंडोलकर (रा. धो. खानोलकर हायस्कूल, मठ) याने तृतीय क्रमांक मिळवला. यश आरती आत्माराम सावंत (न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा) आणि गुरुदेव अपूर्वा नारायण दामले (रा. कृ. पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली.इयत्ता १ ली ते ५ वी गटात ज्ञानेश्वरी श्रद्धा प्रविण तांडेल (श्री शिवाजी हायस्कूल, तुळस) हिने प्रथम क्रमांक पटकावला. प्रांजल ऋतुजा रुपेश नार्वेकर (जि. प. शाळा उभादांडा नं. ३) याने द्वितीय क्रमांक मिळवला, तर सान्वी सेजल स्वप्नील रजपूत (जि. प. शाळा वेंगुर्ला नं. १) हिने तृतीय क्रमांक मिळवला. अध्या प्रीती ललित खापरे (जि. प. शाळा वेंगुर्ला नं. १) आणि सान्वी साक्षी सहदेव परब (जि. प. शाळा परबवाडी नं. १) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.स्पर्धेचे परीक्षण बाळू खामकर, संजय पुनाळेकर, सहदेव परब, महेश बोवलेकर यांनी केले. विजेत्यांचा मान्यवरांच्या रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होऊन आदर्श व्यक्तिमत्त्वांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमास पालक, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांचे उत्स्फूर्त कौतुक केले.
konkansamwad 
