पाईप क्लिनर प्रशिक्षणातून महिलांचे सक्षमीकरण; कोकण संस्थेचा कौशल्यविकास उपक्रम
बांदा
कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत रोणापाल यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील महिलांसाठी एकदिवसीय *पाईप क्लिनर प्रशिक्षणातून महिला सक्षमीकरण* उपक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत अधिकारी प्रतिभा आळवे, सदस्य अश्विनी गावडे, ग्रामसंघ अध्यक्षा सुहानी केणी, पोलिस पाटील निर्जरा परब, सीआरपी सृष्टी गाड, संस्थेच्या समन्वयक सानिका गावडे व प्रशिक्षक सेजल गावडे यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यावेळी सानिका गावडे यांनी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या महिला सक्षमीकरण व कौशल्यविकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रशिक्षणात जास्वंद, चाफा, मोदक, शो फ्लॉवरसह पाईप क्लिनरपासून विविध आकर्षक कलाकृती तयार करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.या प्रशिक्षणामुळे महिलांना घरबसल्या हस्तकला वस्तू तयार करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. समारोपप्रसंगी नमिता शेगडे व सृष्टी गाड यांनी प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.
konkansamwad 
