परशुराम उपरकर यांनी हाती बांधले शिवबंधन उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मुंबई
अखेर माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर जाहीर पक्षप्रवेश केला आहे. मनसे पक्षातून बाहेर पडल्यावर उपरकर कोणत्या पक्षात जातील असा प्रश्न सर्वांना होता. अखेर या प्रश्नाला पूर्णविराम देत उपरकर यांनी शिवबंधन हाती बांधले. या प्रवेशामुळे उबाठा शिवसेनेला सिंधुदुर्गात बळ मिळेल असे म्हटले जाते. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, माजी खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, संजय पडते, संग्राम प्रभुदेसाई आदी उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने विधानपरिषद सदस्य झालेल्या परशुराम उपरकर यांनी तब्बल 12 वर्षांनी पुन्हा ठाकरे शिवसेनेत स्वगृही प्रवेश केला असून विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर उपरकर यांनी केलेला पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. उपरकर यांच्यासह त्यांचे समर्थक आशिष सुभेदार, बाबल गावडे, दीपक गावडे, अप्पा मांजरेकर, राजेश टंगसाळी, विनोद सांडव, नाना सावंत, आबा चिपकर, शैलेश मयेकर, मंदार नाईक, अभय देसाई,प्रकाश साटेलकर, सुरेंद्र कोठावळे, मनोज कांबळी यांनीही ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.