‘जागतिक पाणथळ दिनानिमित्त’ ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रा.डॉ.मोहित रोजेकर यांची मुलाखत.

‘जागतिक पाणथळ दिनानिमित्त’ ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रा.डॉ.मोहित रोजेकर यांची मुलाखत.

मुंबई.

   माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘जागतिक पाणथळ दिन’ या विषयावर राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे येथील जीव रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.मोहीत रोजेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
   पर्यावरणाच्या दृष्टीने पाणथळ (रामसर) स्थळांना अतिशय महत्त्व आहे. या पाणथळ स्थळांचे जतन व संवर्धन होण्यासाठी दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक पाणथळ दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. पाणथळ जागांमुळे भूजल पुनर्भरण, सूक्ष्म पर्यावरणाचा समतोल राखणे, पशुपक्षी, एकपेशीय जीव, विविध लव्हाळी, ऑक्सिजनसाठी पोकळ्या निर्माण करणाऱ्या वनस्पती अशा प्रक्रिया रामसर स्थळांमध्ये निसर्गतःच होत असतात. या पाणस्थळ स्थळांचे जतन व संवर्धन होण्यासाठी जनजागृतीच्यादृष्टीने शासनस्तरावर पावले उचलण्यात आली आहेत. त्याअनुषंगानेच या दिनानिमित्त ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून पर्यावरणीयदृष्ट्या या स्थळांचे महत्व, याबाबतची माहिती  प्रा. डॉ. रोजेकर यांनी दिली आहे.
   ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून प्रा. डॉ. रोजेकर यांची मुलाखत शुक्रवार दि. 2, शनिवार दि. 3 आणि सोमवार दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR