कुडाळ येथे १५ फेब्रुवारी रोजी गिरणी कामगार व वारसदारांचा मेळावा.
कुडाळ.
सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागाच्या वतीने गिरणी कामगार व वारसदारांचा मेळावा कुडाळ येथे गुरुवार दि.१५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वा. सिद्धिविनायक हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
गिरणी कामगार व वारसदारांसाठी १४ सप्टेंबर २०२३ पासून पात्रता निश्चिती करण्याची म्हाडा मार्फत अभियान राबविले आहे त्यातील पात्र गिरणी कामगारांची अंतिम यादी त्वरित झाली पाहिजे तसेच म्हाडाच्या ताब्यात आलेल्या व येणाऱ्या मुंबईतील तेरा खाजगी व एन टी सी च्या ७ गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगार वारसदारांसाठी त्वरित घरांचे बांधकाम सुरू झाले पाहिजे तसेच सर्वच गिरणी कामगार व वारसदारांना मुंबईत मोफत घरे मिळाली पाहिजे या मागण्याकरता सर्व श्रमिक संघटनांच्या गिरणी कामगार विभागाच्या वतीने १५ फेब्रुवारी रोजी कुडाळ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात पुढील तीव्र आंदोलनाची घोषणा केली जाणार आहे या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी कॉ. उदय भट, कॉ बि के आंब्रे, कॉ विजय कुलकर्णी, कॉ संतोष मोरे, कॉ अनंत मालप, कॉ.शांताराम परब, कॉ सुनील निचम उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील गिरणी कामगार वारसदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी आवाहन प्रमुख संघटक कॉ. शांताराम परब यांनी केले आहे.