तुळस श्री देव जैतिराश्रित संस्थे मार्फत गुणगौरव सोहळा संपन्न.

तुळस श्री देव जैतिराश्रित संस्थेने दरवर्षी प्रमाणे यंदाही २७ डिसेंबर रोजी श्री जैतीर विद्यालय तुळस व २८ डिसेंबर रोजी श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे गावातील सर्व मुलांसाठी बक्षीस समारंभ आयोजित केला होता. अनेक दात्यांनी संस्थेकडे ठेवलेल्या ठेव रकमेतून यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देण्यात आली. तसेच अनेक यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे वह्या व वस्तू रुपात बक्षिसे देण्यात आली. या समारंभात तुळस गावचे जेष्ठ उद्योगपती व संस्थेचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री सदाशिव गणेश तथा दादा साहेब परुळकर व जेष्ठ कार्यकर्ते श्री मधुकर देसाई यांचा वयाची ९१ वर्षे पूर्ण केल्याबद्दल सत्कार करून दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दोन्ही समारंभासाठी तुळस गावच्या सरपंच सौ.रश्मी परब,संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रभानंद सावंत, उपाध्यक्ष श्री. विष्णू परब, खजिनदार श्री.कृष्णा तावडे व कार्यकर्ते सर्वश्री मंगेश राऊळ, शशिकांत घारे, वासुदेव नाईक, साबाजी नाईक , उदय शिरोडकर, श्रीमती आनंदी परब, सौ.कल्पना तावडे,सौ.मालती देसाई उपस्थित होते. तसेच श्री जैतीर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सावंत, श्री. शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री.संदिप तुळसकर, स्थानिक कार्यकर्ते सर्वश्री प्रा.डॉ.सचीन परुळकर,बाबली कुडव, सगुण माळकर, प्रकाश परब, विवेकानंद परब, जयवंत तुळसकर, वासुदेव (पिंट्या) राऊळ उपस्थित होते.