संघर्षातून उभा राहिलेला माणूस थांबला.....माणगावचे लाडके 'संदेश भाई' कालवश

संघर्षातून उभा राहिलेला माणूस थांबला.....माणगावचे लाडके 'संदेश भाई' कालवश

माणगाव 

 

     माणगाव तिठा येथील हॉटेल प्रथमचे मालक आणि माणगाव ग्रामपंचायतचे माजी सदस्य शिवराम उर्फ संदेश केसरकर (वय ५४) यांचे आज शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.गेली साडेचार वर्षे ते कॅन्सरशी झुंज देत होते. २०२२ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तरीही त्यांनी धीराने आजाराचा सामना केला.गरिबीतून कष्टाने संसार उभा करणारे संदेश भाई हे कष्टाळू शेतकरी, जिव्हाळ्याचे हॉटेल व्यावसायिक आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. माणगाव हायस्कूलमध्ये शिक्षण घेताना ते उत्कृष्ट स्मॅशर म्हणून ओळखले जात. २००३ मध्ये कट्टावाडी प्रभागातून अपक्ष म्हणून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते.आज सकाळी ११ वाजता माणगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.