पिंगुळी पाझर तलाव वाचविण्यासाठीचे उपोषण मागे, प्रशासनाचे लेखी आश्वासन.....पाच दिवसांनंतर उपोषणकर्त्यांना यश, विकासकाला सूचनांचे पालन करण्याचे आदेश

पिंगुळी पाझर तलाव वाचविण्यासाठीचे उपोषण मागे, प्रशासनाचे लेखी आश्वासन.....पाच दिवसांनंतर उपोषणकर्त्यांना यश, विकासकाला सूचनांचे पालन करण्याचे आदेश

कुडाळ

 

     कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील पाझर तलाव वाचविण्यासाठी कुडाळ प्रांत कार्यालयासमोर जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर आणि पिंगुळी ग्रामस्थांचे सोमवारपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण अखेर आज पाचव्या दिवशी मागे घेण्यात आले. प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी पिंगुळी ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या मान्य करीत लेखी आश्वासनाचे पत्र दिले. तसेच विकासकाला सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले. प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी उपोषणकर्ते गंगाराम सडवेलकर यांना लिंबू पाणी दिल्यानंतर उपोषणकर्ते गंगाराम सडवेलकर यांनी बेमुदत उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले.पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी गेल्या पाच दिवसांपासून निर्धाराने उपोषण सुरू ठेवले होते. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.