वेंगुर्ला बंदरात बुडालेल्या ४ जणांपैकी दुसरा मृतदेह आढळला सागरेश्वर किनारी.

वेंगुर्ला बंदरात बुडालेल्या ४ जणांपैकी दुसरा मृतदेह आढळला सागरेश्वर किनारी.

वेंगुर्ला.

   वेंगुर्ला बंदरात बोट उलटल्याची घटना रात्री घडली आहे. बोट उलटल्यामुळे सात खलाशी बुडाले होते. त्यापैकी तीन खलाशांनी पोहून किनारा गाठला, त्यामुळे त्यांच्या जीव वाचला. यापैकी चार खलाशी बेपत्ता होते. त्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली होती.तेव्हा त्यातील एका खलाशांचा मृतदेह सापडला आहे.तर तीन जण  बेपत्ता होते.दरम्यान सायंकाळच्या सुमारास सागरेश्वर समुद्रकिनारी एक खलाशाचा मृतदेह सापडला असून शिवराम कोल असे मृत व्यक्तीचे नाव आहे.उर्वरित दोन खलाशांचे शोधकार्य युध्दपातळीवर सुरू आहे.
   सदर घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ऋषिकेश रावले, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतरी, पोलीस कर्मचारी, स्थानिक मच्छिमार, नागरिक पोलीस पाटील दाखल झाले होते.