जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ डिसेंबरला.....तक्रारदारांनी १५ दिवस आधी अर्ज दाखल करण्याचे आवाहन
सिंधुदुर्ग
नागरिकांच्या रखडलेल्या तक्रारी आणि समस्यांवर जलदगतीने तोडगा काढण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा डिसेंबरमधील जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. ७ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुपारी १ ते २ या वेळेत हा लोकशाही दिन होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या व्यासपीठावर आपली बाजू मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनाने काही अटी व नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार, अर्जदारांनी विहित नमुन्यात दोन प्रतींमध्ये आपला अर्ज लोकशाही दिनाच्या किमान १५ दिवस आधी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोच करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, जिल्हास्तरावर थेट तक्रारी स्वीकारल्या जाणार नसून, नागरिकांनी आधी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असणे गरजेचे आहे. तालुका स्तरावरील लोकशाही दिनात झालेल्या कार्यवाहीवर किंवा उत्तरावर तक्रारदाराचे समाधान झाले नसल्यास, त्यानंतरच ते जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज करू शकतील. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
konkansamwad 
