अर्पिता महादेव वेतुरेकर यांचा आमदार वैभव नाईक यांनी केला सत्कार.

अर्पिता महादेव वेतुरेकर यांचा आमदार वैभव नाईक यांनी केला सत्कार.

कुडाळ.

  तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सोनवडे टेंबवाडी इयत्ता दुसरी मध्ये शिकत असणारी अर्पिता महादेव वेतुरेकर हिने बी. डी. एस. (ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेमध्ये) ९७% मार्क मिळवून देशात ६७ वा. क्रमांक मिळवला आहे. वडिल महादेव मधुकर वेतुरेकर हे शेतकरी असून मुलीला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. घरची परिस्थिती हलाखीची असूनही कु.अर्पिता हिने मन लावून अभ्यास केला. व उत्तम असे यश प्राप्त केले. या यशाबद्दल आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सायंकाळी सोनवडे येथे राहत्या घरी भेट देत तिचे व तिच्या वडिलांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
   यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख सचिन कदम, महेश सावंत, आबा मुंज,राजू घाडी, मोहन घाडी, पि डी सावंत, काशीराम घाडी, गुरु मेस्त्री, रुपेश घाडी, चंदन ढवळ, दीपक नळेकर आदी उपस्थित होते.