अचानक डुलकी आल्याने कारवरील नियंत्रण सुटून अपघात.....सुदैवाने जीवितहानी नाही

अचानक डुलकी आल्याने कारवरील नियंत्रण सुटून अपघात.....सुदैवाने जीवितहानी नाही

कणकवली

 

       पुणे ते मालवण जात असताना चालकाला अचानक डुलकी आल्याने कारवरील नियंत्रण सुटून अपघात झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सावडाव फाट्यानजीक घडला. नियंत्रण सुटलेली कार रस्त्यापासून सुमारे १०० मीटर अंतरावरील जंगलमय भागात जाऊन थांबली. अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र कारचे नुकसान झाले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने जंगलमय भागात अडकलेली कार बाहेर काढण्यात आली. सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना टळली.