देवगड आनंदवाडी येथे १७ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन.

देवगड.
श्रीराम मित्रमंडळ, नवयुवक दक्षिणवाडा आनंदवाडी-देवगड यांच्यातर्फे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त १७ एप्रिल रोजी रात्री १० वा. जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १३ वर्षाखालील लहान गटातील प्रथम, द्वितीय क्रमांकांना अनुक्रमे तीन हजार रुपये, दोन हजार रुपये व आकर्षक चषक, तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी एक हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. १३ वर्षावरील मोठ्या गटातील प्रथम, द्वितीय क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार रुपये, तीन हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तृतीय व चतुर्थ क्रमांकांना प्रत्येकी एक हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी उत्तम मुणगेकर (८१८०९५६९१२) यांच्याशी संपर्क साधावा.