परुळे येथे राधारंग फाउंडेशनच्या वतीने २६ जानेवारी रोजी नाट्यगीत गायन स्पर्धा.

परुळे येथे राधारंग फाउंडेशनच्या वतीने २६ जानेवारी रोजी नाट्यगीत गायन स्पर्धा.

वेंगुर्ला.

   परुळे युवक कला क्रिडा मंडळ, राधारंग फाउंडेशन  पुरस्कृत नाट्यगीत गायन स्पर्धा दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेसाठी पारितोषिके पुढीप्रमाणे प्रथम क्रमांक रु.३००० आणि स्मृतिचिन्ह,द्वितीय क्रमांक रु.२५०० आणि स्मृतिचिन्ह, तृतीय क्रमांक रु.२००० आणि स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ रु.१००० आणि स्मृतिचिन्ह अशी आहेत.

स्पर्धेचे नियम पुढीप्रमाणे-

या स्पर्धेत १८  वर्षावरील स्त्री पुरुष सहभागी होऊ शकतात. 

ही स्पर्धा  सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती मर्यादित आहे.
 
एका स्पर्धकास एकच गीत सादर करता येईल. 

रंगभूषा,वेषभूषा यांचा विचार परिक्षणात केला जाणार नाही.

२० जानेवारी पर्यंत नाव नोंदणी करणा-या १२ स्पर्धकांची स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल.

स्पर्धकाने येताना वयाचा पुरावा (ओळखपत्र, आधारकार्ड) सोबत आणणे आवश्यक आहे. पुरावा नसल्यास किंवा वयोगटात बसत नसल्यास स्पर्धेतील प्रवेश रद्द करण्यात येइल.

संगीत साथ आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येईल.

सादरीकरणाचा वेळ ५ ते ७ मिनिटांचा राहील.

सन्माननीय परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
    अधिक माहीतीसाठी आणि नाव नोंदणीसाठी डॉ.प्रशांत सामंत ९४२३३१८२३१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.ही स्पर्धा शुक्रवार दि.२६ जानेवारी २०२४ रोजी सायं. ४ वा. श्री देवी वराठी मंदिर परुळे बाजार येथे होईल.