फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास आ.नितेश राणे यांच्या हस्ते शवपेटीचे वितरण.

फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास आ.नितेश राणे यांच्या हस्ते शवपेटीचे वितरण.

देवगड.

  जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ध्येय उराशी बाळगुन आम. नितेश राणे यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत कोकण विकास आघाडी यांच्या सहकार्याने देवगड तालुक्यातील फणसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास शवपेटीचे वितरण करण्यात आले.
   यावेळी उपस्थित वैद्यकीय अभियंता श्रीमती महेंद्रकर मॅडम, कोकण विकास आघाडी उपाध्यक्ष विजय घरत, देवगड भाजपाचे पदाधिकारी  संदीप साटम, संतोष किंजवडेकर, डॅा.अमोल तेली, रवी पालेकर, फणसगाव व विट्ठलादेवीच्या सरपंच शीतल पाटील, ज्योती नारकर उदय पाटील, उपसरपंच भुषण नरसाळे, बब्या नर, भाजप पदाधिकारी,शिवसेनेचे अनिरूध्द नारकर, विष्णु कदम, प्रशांत जाधव ( भाजपा उपाध्यक्ष मलबार हिल ) भरत मिस्त्री (उद्योजक) व विश्वराज गोपाळे उपस्थित होते. सदर  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फणसगावचे ग्रा.सदस्य कृष्णकांत ( बाबु ) आडिवरेकर व इतर सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले