जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये तलवारबाजी स्पर्धेत कळसुली इंग्लिश स्कूलचे यश.

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये तलवारबाजी स्पर्धेत कळसुली इंग्लिश स्कूलचे यश.

कणकवली.

   जिल्हास्तरीय शालेय गटातील क्रीडा स्पर्धांमध्ये तलवारबाजी स्पर्धेत कळसुली इंग्लिश स्कूल कळसुलीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक सुयश विद्यालयाचे नाव उज्वल केले आहे.जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा कणकवली विद्यामंदिर प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये एकूण नऊ शाळा मधून 67 विद्यार्थी स्पर्धेत होते यामध्ये 19 वर्षाखालील मुली गटामध्ये, कुमारी डिंपल दत्ताराम दळवी (खेळ प्रकार फॉईल) प्रथम क्रमांक, कुमारी प्राची दीपक घाडी (खेळ प्रकार सेबर) प्रथम क्रमांक, कुमारी मधुरा शांताराम शिंदे (खेळ प्रकार ईपी) चतुर्थ क्रमांक. 19 वर्षाखालील मुले यामध्ये गिरीश मनोज घाडीगावकर (खेळ प्रकार फॉईल) द्वितीय क्रमांक, आदित्य संतोष गावकर (खेळ प्रकार सेबर) तृतीय क्रमांक आणि 17 वर्षाखालील मुले गटांमध्ये सौरभ प्रमोद नाईक (खेळ प्रकार फॉईल) तृतीय क्रमांक स्मित सुहास कदम (खेळ प्रकार फॉईल) चतुर्थ क्रमांक 17 वर्षाखालील मुली कुमारी धन्वंतरी मनोज राणे (खेळ प्रकार फॉईल) द्वितीय क्रमांक कुमारी जासिया शकील मालीम (खेळ प्रकार फॉईल) इत्यादी विद्यार्थ्यांनी तलवारबाजी स्पर्धेत घवघवीत यश मिळवून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
   या खेळाडूंची निवड विभागीय स्पर्धेसाठी झालेली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक श्री. एस. के. सावळ यांचे अभिनंदन संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक-पालक संघ शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी, समस्त ग्रामस्थ, पालक वर्गातून करण्यात येत आहे.