उभादांडा येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या.
वेंगुर्ला.
उभादांडा वरचेमाडवाडी येथील आंब्याच्या झाडास एका तरुणाने नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. प्रितेश रत्नाकर मयेकर ( ३८) असे मृत तरुणाचे नाव आहे.
ही घटना मंगळवार सायंकाळी उघडकीस आली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. प्रितेश याचा भाऊ व सचिन भिकाजी सोनसुरकर हे शोध घेण्यासाठी गेले असता यांना आंब्याच्या झाडाला प्रितेश याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणी अधिक तपास वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर व पो.ह.योगेश वेंगुर्लेकर करीत आहेत.

konkansamwad 
