देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीमधील प्रलंबित विकासकामांची माहिती मिळावी. शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.
देवगड.
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील मंजूर झालेली प्रलंबित विकासकामे का रखडली याबाबतची माहिती मिळावी अशी मागणी शिंदे गट तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देवगड जामसंडे नगरपंचायत हददीमध्ये मंजूर होवूनही प्रलंबित विकासकामे अदयापही रखडलेली आहेत. या मंजूर कामांची निविदाप्रक्रीया होवून संबंधीत मक्तेदारांकडून अनामत रक्कम भरुन अदयापही कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्याचे दिसून येत नाही. त्याबाबत सविस्तर खुलासा करण्यात यावा या बरोबरच मक्तेदांची बीड कॅपॅसीटी प्रशासनाकडून तपासणी केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी त्याची बीड कॅपॅसीटी तपासणी केली असल्यास त्याची माहीती ही सविस्तर देण्यात यावी. या नगरपंचायत हददीमधील प्रलंबित रखडलेली विकासकामांबाबत सविस्तर माहीती देण्यात यावी या विकास कामांबाबत आवश्यक असणारी जागा (जमीन) नगरपंचायत मालकीची आहे अथवा संबंधीत जागा (जमीन) त्या मालकाने हस्तांतरीत केली असल्याबाबतची सविस्तर माहीती विकास कामांचा तपशीलप्रमाणे देण्यात यावी. वरील विकास कामांच्याबाबत या मागणी केल्याप्रमाणे सविस्तर माहीती येत्या आठ दिवसात मिळावी.अशी मागणी शिंदे गट शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.