जुना पत्रादेवी बांदा रोड येथे बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी एकाला अटक. एकुण ७ लाख ७६ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त.

जुना पत्रादेवी बांदा रोड येथे बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी एकाला अटक.  एकुण ७ लाख ७६ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त.

सावंतवाडी.

    बेकायदेशीर दारू वाहतूक केल्या प्रकरणी जुना पत्रादेवी बांदा रोड आरोसबाग तिठ्याजवळ मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास संशयीत वाहनांची तपासणी करीत असताना ग्रे कलरचे स्कॉर्पिओ चारचाकी वाहन क्र. एमएच-०७-जे-०३३५ या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रॅन्डचे ५० बॉक्स अवैध मद्यसाठा मिळून आला. या प्रकरणी चेतन पुरुषोत्तम देऊळकर ( वय २९ वर्षे रा. सावंतवाडी) याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. यात ३ लाख २६ हजार ४०० रुपये किंमतीचे मद्य व ४ लाख ५० हजार किंमतीचे चारचाकी वाहन असा मिळून ७ लाख ७६ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
  सदर कारवाई  संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, तानाजी पाटील दुय्यम निरीक्षक, प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक, गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक,  दिपक वायदंडे जवान यांनी केली. सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली तानाजी पाटील हे करीत आहेत.