परुळेत भरोसा सेलतर्फे ज्येष्ठ नागरिकांची बैठक संपन्न; समस्यांवर साधला संवाद

परुळेत भरोसा सेलतर्फे ज्येष्ठ नागरिकांची बैठक संपन्न; समस्यांवर साधला संवाद

परुळे 


      परुळे पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भरोसा सेल, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत परुळे बाजार येथे ज्येष्ठ नागरिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी व समस्या मांडल्या. यावेळी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी भरोसा सेल, सिंधुदुर्गच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीम. जाधव, प्रियांका सामंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, परुळे बाजार उपसरपंच प्राजक्ता पाटकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजय परब, पोलीस पाटील श्वेता चव्हाण, जान्हवी खडपकर, संदेश पवार, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून त्याचा क्रमांक ७०३६६०६० आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.