भाजप युवा मोर्चा तर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वेंगुर्ल्यात स्वागत.

भाजप युवा मोर्चा तर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वेंगुर्ल्यात स्वागत.


वेंगुर्ला 
    संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले मंदिर स्वच्छता अभियान सुरु आहे. या स्वच्छता अभियानास वेंगुर्ला तालुक्यात श्री देवी सातेरी मंदिर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित राहिले. 
     यावेळी त्यांचे वेंगुर्ल्यात आगमन होताच युवा मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी विधान सभा प्रमुख हितेश धुरी, जिल्हा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, परबवाडा उपसरपंच पपू परब, परबवाडा ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, संतोष सावंत, तुषार साळगावकर, शहराध्यक्ष प्रणव वायगणकर, सायमन आल्मेडा, ऋतिक आंगचेकर, अमेय धुरी आदी उपस्थित होते